अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-कारागृहात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. नव्याने दोन कैदी पाॅझिटिव्ह आढळले. यापूर्वी २१ जणांना २९ व ३० जुलैला बाधा झाली होती. दरम्यान, गुरुवारी तालुक्यात २४ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या २०७० झाली.
१४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने १८१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यातील १२७ गावांपैकी ११० गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सर्वाधिक ३२३ रुग्ण एकट्या सोनई गावात आढळले आहेत.
तालुका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रॅपिड अँटिजेन टेस्ट मध्ये १९, जिल्हा रुग्णालय ४ व खासगी रुग्णालयांतून आलेल्या
एक असे २४ रुग्ण बाधित आढळले. अंतरवली ४, सोनई ३, वडाळा ३, भेंडे बुद्रूक २, बेल्हेकरवाडी २, कुकाणे २, नेवासे कारागृह २, तर शिंगणापूर, कौठा, खुणेगाव, चांदे, गणेशवाडी, देवसडे
येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. २२४ बाधितांवर उपचार सुरू असून आता सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर तपासणी सुरू आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved