अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला.
त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. तालुक्यात काल 58 जणांच्या रॅपीड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात 15 लोक नव्याने बाधित आढळून आले.
त्यामुळे बाधितांची संख्या तालुक्यात 501 झाली आहे. सध्या तालुक्यातील संतलुक हॉस्पिटलमध्ये 36 रुग्ण तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड सेंटरमध्ये 29 जण उपचार घेत आहेत.
काल पॉझिटिव्ह आलेल्या १५ रुग्णांमध्ये वॉर्ड नं. एकमध्ये 3, वॉर्ड नं. दोन मध्ये 1, वॉर्ड नं. तीनमध्ये 2, वॉर्ड नं. सातमध्ये 2, पढेगाव 1, वडाळा महादेव 1, बेलापूर 1, महांकाळवाडगाव 1, अशोकनगर 2, पाथरे 1 आदी रुग्णांंचा समावेश आहे.
दरम्यान अहमदनगरमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. वैद्यकीय सेवेवरही ताण वाढत आहे. त्यामुळे सर्वतोपरी काळजी घेण्याचे आणि काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved