अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. शिर्डी शहर कोरोनमुक्ती कडे वाटचाल करत असतानाच त्या ठिकाणी पुन्हा कोरोनाने आपली मुळे रोवली आहेत.
शिर्डी शहरात दोन दिवसांत तब्बल 16 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. काल (बुधवार) शहरातील प्रसिद्ध व्यापारी कुटुंबातील 9 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आत्तापर्यंत शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या 23 वर गेली आहे.
शिर्डी शहरात मंगळवारी सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संबंधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने आपल्या स्रावाचे नमुने तपासणीसाठी खाजगी लॅबमध्ये पाठविले होते.
27 पैकी 9 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 18 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सदरचे नऊ व्यक्ती शिर्डीतील व्यापारी कुटुंबातील असल्याचे नगरपंचायतचे नोडल अधिकारी मुरलीधर देसले यांनी सांगितले.
या 9 बाधितांच्या संपर्कात येणार्या व्यक्तींचा शोध युद्धपातळीवर सुरू करण्यात आला असून त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या स्रावाचे नमुने जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews