भारतातील या राज्यात कोरोनाची लस मोफत !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- केरळमधील नागरिकांना करोना लस मोफत मिळणार आहे. लस मोफत देण्याची घोषणा करणारे तिसरे राज्य ठरले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ही घोषणा केली.

केरळमध्ये करोनावरील लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. केरळ आता तिसरे राज्य ठरले आहे, जिथे करोना लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

या अगोदर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीस्वामी यांनी ऑक्टोबर महिन्यात राज्यातील नागरिकांना मोफत कोरोना लस दिली जाईल असे जाहीर केले.

यानंतर मध्यप्रदेशकडून देखील ऑक्टोबरच्या शेवटी अशाचप्रकारची घोषणा केली गेली.दरम्यान, देशाची आरोग्य व्यवस्था कोरोना लसीकरणासाठी सज्ज झाली आहे. देशभरात टप्प्याटप्प्याने ही लसीकरण मोहिम राबवली जाणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24