अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभर धुमाकूळ घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने आता अहमदनगर शहरात देखील आपले पाय रोवण्यास सुरूवात केली आहे.जाणून घ्या कोरोना व्हायरसबाबत प्रशासनाचे अपडेट्स, उपाययोजना,निर्णय, माहिती व बातम्या या पेजवर.
(लास्ट अपडेट 4.22 AM 16-03-2020)
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने पावले उचलली आहेत.
नगरमध्ये कोरोनाचा आढळून आलेला रुग्ण ठणठणीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे,
नगरमध्ये आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाची परिस्थिती आता ठणठणीत आहे. जे हाय रिस्क संशयित रुग्ण होते त्यांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
दरम्यान आठ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्यांपैकी एका रुग्णास स्वाईल फ्ल्यू झाला असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले आहे.
राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 37 वर पोहोचली असून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने शहरातील शाळा, महाविद्यालये, वस्तीगृहे, सिनेमागृहे, शासकीय कार्यालयातील बायोेट्रिक हजेरी बंद करण्यात आली आहे.
रविवारी जिल्हा रुग्णालय येथे कोरोना आजारासंबंधित 27 जणांची तपासणी करण्यात आली. 19 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
त्यातील आठ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित 11 जणांचे रिपोर्ट लवकरच मिळणार आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील दोघांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी एनआयव्ही, पुणे येथे पाठवले.
या आपत्तीचा एकजुटीने सामना करा…
जिल्हयातील महानगरपालीका, सर्व नगरपालीका/नगरपचंयात क्षेत्रातील चित्रपटगृह, जलतरण तलाव, व्यायामशाळा व नाटयगृहे दि. ३१ मार्च पर्यत बंद
जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व नगरपालिका व सर्व नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाड्या दि. 31 मार्चपर्यंत बंद.
जिल्ह्यामध्ये नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हयात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांना परवानगी नाही.
जिल्हा रुग्णालयातून पसार झालेले तिघेही संशयित रुग्ण पुन्हा रुग्णालयात दाखल.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com