गणेश मंडळाच्या बैठकीत उपस्थित राहिलेले अध्यक्षच कोरोना पॉझिटिव्ह, प्रतिष्ठीत धास्तावले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  सध्या गणेशोत्सवाची सर्वत्र तयारी सुरु आहे. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा उत्सव साध्या पद्धतीने आणि प्रशासकीय नियम पाळून साजरा केला जाणार आहे.

या संदर्भात अहमदनगर शहरातील गणपती मंडळांच्या अध्यक्षांची एक बैठक बोलावली होती. परंतु या बैठकीत उपस्थित असणाऱ्या मानाच्या एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने

बैठकीला उपस्थित असणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आधल्या दिवशी बैठक अन् दुसर्‍या दिवशी आलेला पॉझिटिव्ह रिपोर्ट यामुळे प्रमुख मंडळाचे प्रतिष्ठित पदाधिकारी चिंतेत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव कसा साजरा करावयाचा या संदर्भात निर्णय घेण्यासाठी पोलीस प्रशासनाने मानाच्या गणेश मंडळांची बैठक रविवारी आयोजित केली होती.

शहरातील प्रतिष्ठित अन् मानाच्या मंडळाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर प्रमुखांनी एकत्रितपणे वरिष्ठांना साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे पत्र दिले.

हे पत्र देताना जे उपस्थित होते, त्यातील एकाचा रिपोर्ट दुसर्‍या दिवशी (सोमवारी) पॉझिटिव्ह निघाला. त्यामुळे याठिकाणी उपस्थित असणाऱ्यांना आता धास्ती भरली आहे.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढतच चालले आहे. शहरी भागातील संक्रमण आता ग्रामीण भागातही पसरल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24