मंत्र्यांच्या तालुक्यात कोरोनाची गाडी सुसाट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता नगरकरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे.

संगमनेर तालुक्यात मागील ५ दिवसांत १९३ कोरोना बाधित आढळले. एकूण संख्या ५४७४ झाली आहे. त्यातील ५०११ रुग्ण बरे झाले असून २४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ४६ जणांचा मृत्यू झाला आहे.

गुरुवारी ४५, शुक्रवारी ३४, शनिवारी ४०, रविवारी १०, तर सोमवारी ३० बाधित आढळले. यातील फक्त ३२ शहरांतील असून १६१ ग्रामीण भागातील आहेत.

शहरापेक्षा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बाधित सापडत आहेत. बरे होण्याचे प्रमाण ९४.८९ टक्के असून मृत्यू दर ०.८७ टक्के आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24