अहमदनगर Live24 ,17 जून 2020 : अहमदनगर : कोरोनामुक्त शेवगावात पुन्हा कोरोनाची एन्ट्री झाली आहे. मुंबईहुन शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथे आलेल्या एस.टी.चालकाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कैलास कानडे यांनी सांगितले.
त्यामुळे शेवगावात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोना बाधित व्यक्ती एस.टी. महामंडळात चालक पदावर कार्यरत आहे. लॉकडाउनच्या काळात आपल्या घरी भावीनिमगाव येथेच ते राहत होते. मात्र लॉकडाऊन शिथिल होताच त्यांना कर्तव्यावर मुंबई येथे हजर होण्याच्या सूचना प्राप्त झाल्या. त्यामुळे ते आपल्या कर्तव्यावर हजर झाले.
पुन्हा सुट्टी असल्याने ते १३ जूनला गावी परतले. आल्याबरोबर कोणाच्याही संपर्कात न येता ते विलगीकरण कक्षात दाखल झाले. मात्र येथे येताच काही तासांतच त्यांना काहीसा त्रास जाणवू लागला. दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणी करून पुढील तपासणीसाठी नगर येथे हलवले. दि.१६ जूनला त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews