अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- संगमनेर शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. संगमनेर शहरात ११ तर ग्रामीण भागात १९ असे एकूण करोनाचे ३० पॉजिटिव्ह रुग्ण बुधवारी (दि.१५) एकाच दिवशी आढळले.
ग्रामीण भागातील घुलेवाडीतील ६५ वर्षीय पुरुष तर तळेगाव दिघेतील ४२ वर्षीय पुरुष करोना पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. यापैकी ९५ जणांवर उपचार करण्यात आले. निमोण येथील कोरोनाबधितांची संख्या जास्त आहे.
येथे कोरोनामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात करोनामुळे मरणाऱ्यांची एकूण संख्या २६५ वर जावून पोहोचली आहे. पठारभागातील माहुलीतील ५६, शहरातील भारतनगर येथील ३९, संगमनेर शहरातील मेनरोड येथील ४३ वर्षीय महिला,
३० वर्षीय तरूण, २८ वर्षीय तरूण, ग्रामीण भागातील तळेगाव दिघे येथील ६० वर्षीय महिला, १९ वर्षीय युवती, २५ वर्षीय युवक, तसेच ७, १२ आणि ५ वर्षीय बालिका, ३५ आणि ४० वर्षीय हे दोघे पॉझिटिव्ह आहेत.
गणेशनगरगल्ली क्रमांक दोनमधील तरूण, ७ वर्षीय बालक निगेटिव्ह झाले आहेत. संगमनेर तालुक्याचा सर्वांगीण विचार केल्यास या तालुक्यात करोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.
त्यामुळे करोनाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा एकदा संगमनेर लॉकडाऊन करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews