मनपा अडचणीत ! थकबाकीदारांची यादीविना वसुली कशी होणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी शास्तीत सूट दिली. त्यामुळे मागील दोन महिन्यांत वसुलीचा आकडा वाढला. दररोज १५ ते २० लाखांचा भरणा होत होता.

मात्र, शास्तीच्या सवलतीची मुदत संपल्याने वसुली मोहीम थंडावली आहे. सध्या दररोज ४ ते ५ लाखांचा भरणा होत आहे. मात्र पुन्हा एकदा कर वसुलीसाठी महानगर पालिकेने सकारात्मक पाऊले उचलली आहे.

मात्र हे सगळं सुरु असताना मनपा समोर एक मोठे संकट येऊन उभे राहिले आहे.कर वसुलीसाठी आवश्यक आहे थकबाकीदारांची यादी, मात्र मनपाने नेमलेल्या लपिकांकडे थकबाकीदारांची यादीच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दरम्यान कर वसुली तर करायची आहे मात्र आता थकबाकीदारांची यादी नसेल तर वसुली करणार कशी, असा सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान महापालिकेचे उपायुक्त संतोष लांडगे यांनी बुरुडगाव प्रभाग समिती कार्यालयाला अचानक भेट दिली.

यावेळी त्यांनी कर वसुली करणाऱ्या लिपिकांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे थकबाकीदारांची यादी आढळून आली नाही. थकबाकीदारांची यादी कुठे आहे, असा प्रश्न लांडगे यांनी केला. त्यावर थकबाकीदारांची यादी नाही पाहतो, असे उत्तर मिळाले.

वसुलीसाठी बाहेर पडतानाच कर्मचाऱ्यांकडे थकबाकीदारांची यादी असणे आवश्यक आहे. परंतु, लिपिकांकडेच यादी नसल्याने ते वसुली कशी करतात, हा प्रश्नच आहे. यावरून प्रभाग समिती कार्यालयांकडून वसुलीचे नियोजन होत नसल्याचे समोर आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24