अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- कोरोनाच्या भितीने देशासह राज्यात लॉकडाऊन आहे. सर्व व्यवहार ठप्प आहेत. या काळात सर्व हॉटेल बंद असताना शिर्डी जवळील सावळीविहीर फाटा येथे कोपरगावच्या एका हॉटेलमध्ये नगरसेवकाचा मुलगा अय्याशी करताना पोलिसांना आढळून आला आहे.
चौकशीअंती नगरसेवकाच्या मुलाने यापूर्वीही असे प्रताप केल्याचे उघड झाले आहे. शिर्डी जवळील सावळीविहीर फाटा येथील नाशिक रोडवर हॉटेल वेलकम तसेच एस्सार रिसॉर्ट हॉटेल आहे.
या हॉटेलमध्ये बुधवारी २९ एप्रिल रोजी काही मुल- मुली आल्याची माहीती शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती.
त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक औताडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक हॉटेल वेलकममध्ये पाठवले. हॉटेलची झडती घेतली असता एका खोलीत तरुण – तरुणी आढळून आले.
पोलीसांनी अधिक चौकशी केली असता मोसिन मेहमुद सय्यद (वय २९ वर्षे रा,गांधीनगर, कोपरगाव) व कोपरगावची एक तरुणी त्याच्यासोबत आढळून आली.त्यांनी सावळी विहीरफाटा येथे येऊन त्यांनी हॉटेल वेलकम येथे एक रूम भाड्याने घेतली होती,
अशी माहीती पोलीसांनी दिली. हॉटेल वेलकम रिसॉर्ट’चे मॅनेजर रामहरी जानराव काळे (२९) हल्ली रा. के. के मिल यांनी तरुणाकडे कोणतेही ओळखपत्र न पाहता त्यांना रूम दिली होती.
त्यामुळे रामहरी जानराव काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मोसिन मेहमुद सय्यद व त्याच्या सोबत आलेल्या तरुणीवर भादवि कलम 188( 2) 269, 271 व साथरोग प्रतिबंधात्मक कायदा ,1897 कलम 234 प्रमाणे व आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 प्रमाणे शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®