पुढील दोन वर्षात एकही मुलगा जन्माला घालणार नाही ‘या’ गावातील जोडप्यांचा निर्धार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : कोरोनाने सर्व देशभर धुमाकूळ घातला आहे. या कोरोनाने अनेक क्षेत्रांवर विपरीत परिणाम केला. परंतु आता नवविवाहित जोडप्यांवर याचा परिणाम होऊ लागला आहे.

याचाच एक परिणाम म्हणजे कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील जवळपास शंभर नवविवाहित व तरुण जोडप्यांनी पुढील दोन वर्ष एकही मूल जन्माला न घालण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला आहे.

गोधेगावची लोकसंख्या तीन हजाराच्या आसपास आहे. या गावात २०१९ या वर्षात व यंदाच्या मे अखेर जवळपास १०० तरुणांचे विवाह झाले आहेत.

गोधेगावचे सरपंच अशोक भोकरे यांनी सोमवारी (दि.१ जून) कोरोनाच्या उपाययोजना व प्रतिबंध करण्यासाठी ग्रामस्थांची फिजिकल डिस्टन्सिंगने विशेष ग्रामसभा घेतली.

या सभेत विविध निर्णय घेण्यात आले. गावातील नवविवाहित जोडपे व तरुण जोडप्यांना सभेत आवाहन करण्यात आले. २०२० व २०२१ या दोन वर्षात आपल्या गावात आपण एकही अपत्य जन्माला घालू नये.

कारण यापुढील काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कसा राहील हे सांगता येणार नाही. त्यामुळे गरोदर महिलांना उपचारापासून तर प्रसूतीपर्यंत खूप काळजी घ्यावी लागेल.

यातून मातेला व जन्माला आलेल्या बाळाला धोका निर्माण होऊ शकतो. ही गंभीर बाब लक्षात घेता नवविवाहितांनी या आवाहनाला प्रतिसाद देत

ग्रामपंचायतीच्या निर्णयाप्रमाणे कोरोनाचा प्रभाव दूर होईपर्यंत अपत्य जन्मास न घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरपंच अशोक भोकरे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24