अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू अजिंक्य राहाणे (रा. संगमनेर) यांचे मामा संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील शेतकरी राजेद्रं राधाकृष्ण गायकवाड
यांचे मंगळवार दि. 19 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास विहिरीत पाय घसरुन पडल्याने दुर्दैवी निधन झाले आहे. ही घटना घडल्यामुळे त्यांच्या परिवारासह संगमनेर तालुक्यात शोककळा पसरली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास राजेंद्र गायकवाड हे आपल्या शेतातील विहिरीवरील विद्युत मोटार चालु करण्यासाठी गेले होते.
मात्र, बराचं वेळ होऊनही ते घरी लवकर आले नाही. त्यामुळे, त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींनी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. दरम्यान त्याच परिसतरातील काही व्यक्तींना विचारणा देखील केली.
मात्र, त्यांचा शोध लागला नाही. यावेळी तपास करता-करता काहींनी शेतातील विहिरीलगत त्यांना आवाज देऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान एक संशय म्हणून सहज विहिरीत डोकावून पाहिले.
कारण तेथे त्यांची चप्पल पडलेली होती. तर त्यांचा मृतदेह विहरीत आढळून आला. यानतंर एका पोहणार्या व्यक्तीस बोलावून गावकरी व नातेवाईकांच्या मदतीने
त्यांना बाहेर काढून लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उशिर झाला होता. त्यांच्यावर बुधवारी शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com