आठवडे बाजारात पैसे लांबवणाऱ्या तीन महिलांना चोप !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राहुरी :- आठवडे बाजारात खरेदीसाठी आलेल्या महिलांचे पैसे चोरणाऱ्या श्रीरामपूर येथील भामट्या महिलांना नागरिकांनी रंगेहात पकडून चोप दिला.

फटके बसताच चोरलेले पैसे काढून देत या महिलांनी बाजारातून काढता पाय घेतला. गुरूवारी दुपारी राहुरीच्या आठवडे बाजारात ही घटना घडली.

तालुक्याचा बाजार असल्याने भाजीपाला व इतर खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. गर्दीचा फायदा घेऊन ३ भामट्या महिलांनी हात की सफाई केली. भाजीपाला खरेदी करणाऱ्या महिलांचा पाठलाग करत पर्समधील १५०० रूपयांची रोकड त्यांनी लांबवली.

दरम्यान, पर्समधील पैसे काढल्याचे काही नागरिकांनी पाहताच या महिलेला रंगेहात पकडून चोप देण्यात आला. भामट्या महिलांनी चोरलेले १५०० रूपये काढून देत बाजारातून काढता पाय घेतला.

अहमदनगर लाईव्ह 24