कोपरगाव: शिर्डीहून येवले येथे निघालेल्या तेजस्विनी जयसिंग राजपूत (वय २९) या महिलेच्या दोन तोळ्यांच्या सोन्याच्या गंठणाची परळी वैजनाथ-नांदगाव या एसटी बसमध्ये (एमएच १४ बीटी ४७१३) सोमवारी चोरी झाली.
चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर ही एसटी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आली. चोरटा बसमध्ये आहे, सगळ्यांची झडती घ्या, अशी मागणी राजपूर यांनी केल्याने सर्व प्रवाशांची झडती घेण्यात आली, परंतु चोर रस्त्यात उतरुन फरार झाला होता.
याच बसमधील अनेक महिलांच्या पर्स, पुरुषांचे पाकिटे ज्यात आधारकार्ड, पॅनकार्ड होते त्यांचीही चोरी झाल्याचे नंतर लक्षात आले.