कारच्या धडकेत एकाचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर : नगर मनमाड महामार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या कारने धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.१८) रात्री ८ च्या सुमारास घडली.

दिलीप माणिक सोनवणे (वय ४२, रा. वनराई कॉलनी, नवनागापुर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, नवनागापुरमधुन सह्याद्री चौकाकडून वनराई कॉलनीकडे जाणाऱ्या रोडने भरधाव वेगात जाणाऱ्या मारूती सुझुकी डिझायर कारने दिलीप माणिक सोनवणे यांना जोरात धडक दिली. या धडकेत सोनवणे हे गंभीर जखमी झाले.

अपघात होताच कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलिसांनी विश्­वास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास हे.कॉ. पी.डी. कटारे हे करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24