मुलीने हिम्मत दाखविल्याने छेड काढणाऱ्यास चोप देवून पकडले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरात वा. नं. ७, कॅनॉल पुलाजवळील श्री सिद्धीविनायक  हनुमान मंदिराजवळ  श्रीरामपुरात तरूणीची गाडी अडवून छेडछाड करून विनयभंग करणाऱ्याला तरूणीने आरडाओरडा करत जाब विचारल्याने गणेशोत्सव सुरू असल्याने नागरीकांची वर्दळ मोठया प्रमाणावर होती.

हा आरडाओरडा ऐकून जागरूक नागरीकांनी तातडीने तरुणीला काय झाले विचारले. तेव्हा विनयभंग, छेडछाड केल्याची माहिती मिळताच संबंधीत अजहर नावाच्या तरुणास लोकांनी यथेच्छ चोप देवून झोडपले. मात्र कोणीतरी गर्दीत पोलीसांना फोन केल्याने पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले व आरोपीला ताब्यात घेतले.

डिवायएसपी मदने यांनीही रात्रीघटनास्थळी भेट देवून पाहणी केली. दरम्यान रात्री उशिरा २१ वर्षाची वा. नं. ७ मध्ये राहणारी नोकरी करणारी धाडसी तरूणी हिने शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी अजहर सलिम बागवान, रा. वा. नं. २ श्रीरामपूर याच्याविरूद्द गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादीत तरूणीने म्हटले आहे की,

ऑफीसची सुट्टी झाल्यानंतर घरी माझ्या गाडीवरून जात असताना आरोपी अजहर सलिम बागवान हा त्याच्याकडील डिस्कव्हर गाडी नं. एम. एच. १७, बी. सी. ६८२७ हिच्यावरून माझा पाठलाग करत सिद्धीविनायक हनुमान मंदिराजवळ त्याच्याकडील मोटारसायकलने अडवनू तू मला खुप आवडते,

मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला. माझ्याबरोबर लग्न केले नाहीत तर मी तुला व तुझ्या कुटूंबाला जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली.

असे फिर्यादीत म्हटले असून पोलीसांनी आरोपी अजहर सलिम बागवान याला अटक केली असून डिवायएसपी राहूल मदने, पोनि बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई राऊत हे पुढीत तपास करीत आहेत. दरम्यान उपस्थित नागरीकांनी तरूणीच्या धाडसाबद्दल तिचे व तिच्या घरच्यांचे कौतुक केले.

श्रीरामपूर शहरात काही भागात टवाळखोर, छेडछाड करणारे दुसऱ्या भागातून येतात व तरूणींची छेडछाड करतात, हे प्रकार वाढले असून याचा पोलिसांनी वेळीच चोख बंदोबस्त करावा, अन्यथा काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला कोण जबाबदार राहील? असा संतप्त सवाल जमावातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते विचारीत होते. मोठया प्रमाणावर गर्दी जमा झाली होती. विशेष म्हणजे आरोपी एका समाजाचा व तरूणी दुसऱ्या समाजाची.

अहमदनगर लाईव्ह 24