शिवसेना नेत्याच्या पुत्रावर जीवघेणा  हल्ला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर – शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा कोपरगावचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या मुलावर शुक्रवारी रात्री जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात मुलगा निशांत जखमी झाला आहे.

अनिल माधव वैरागळ (टिळकनगर), शुभम दशिंग आणि दोन अनोळखी यांनी हा हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

निशांत हा बसस्टँडजवळ चहा पित होता. त्या वेळी अनिल वैरागळ याने शिवीगाळ करत हुज्जत घातली. शेजारीच उभे असणाऱ्या दुशिंग व इतरांनी स्कूटरच्या डिक्कीतून चाकू काढत निशांतच्या खांद्यावर वार केले. रात्री साडेदहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेने कोपरगावात भितीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी वेळीच धाव घेत शांतता राखली.

अहमदनगर लाईव्ह 24