इंग्रजी बोलून जोडप्याने दुकानदारास फसविले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नेवासा  – ऑनलाईन खरेदीत तसेच ऑनलाईन व्यवहारात तसेच मोबाईलवरील व्यवहारात फसवणूक होण्याचे प्रकार आपण पहातो. एटीएम कार्डद्वारेही फसविण्याचे प्रकार घडले आहेत.

आता तर नवीनच प्रकार समोर आला असून इंग्रजी फाडफाड बोलून एका दुकानदाराला महिलेने व त्याच्याबरोबरील पुरुषाने ३६ हजार रुपयाला फसविले, ‘टोपी’ घातली.

याप्रकरणी नेवासा तालुक्यातील सोनई येथील स्वाती कृषी सेवा केंद्र येथे असलेले दुकानचालक उत्तम सदाशिव पटारे, रा. घोडेगाव यांनी सोनई पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अनोळखी महिला व पुरुष अशा दोघा जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून उत्तम पटारे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, दुकानात असताना गिऱ्हा ईक म्हणून एक महिला व पुरुष दुकानात आले.

बियाणे खरेदी करण्याचा बहाणा करुन पटारे यांचे लक्ष विचलीत करून इंग्रजी भाषेत फाडफाड बोलून पटारे यांच्याशी संवाद साधला . भारतीय चलन कसे आहे ते बघायचे आहे, अशी बतावणी करुन दुकान चालक यांनी दोघा आरोपीना गल्ल्यातील रोख रक्कम स्वतः आरोपींना देवून दाखविली.

या दरम्यान इंग्रजी बोलणाऱ्या महिला व पुरुषाने दुकान चालकाचा विश्वास संपादन करून दिलेल्या रकमेतूनव गल्ल्यातून हात घालून ३६ हजाराची रोख रकम विश्वासघात करुन घेवून गेले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24