कर्नाटकात मोबाइलसाठी मुलाकडून बापाचा खून

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

बेळगावी – मोबाइल वापरण्यास मनाई केल्याने मुलाने त्याच्या साठ वर्षीय बापाचा खून केल्याची घटना कर्नाटकातील ककाथी गावात सोमवारी सकाळी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बापाचा खून करणाऱ्या मुलाचे नाव रघुवीर आहे.

खून केल्यानंतरही समाधान न झाल्याने तो बापाच्या मृतदेहाचे तुकडे करू लागला. घटनास्थळी आल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, मृत वडील तीन महिन्यांपूर्वीच पोलिस सेवेतून निवृत्त झाले होते.

वडिलांनी मुलास मोबाइल वापरू नको, असा सल्ला अनेकदा दिला. यामुळे संतप्त मुलगा रघुवीर याने रविवारी शेजारच्या घरावर दगड फेकत त्यांच्या घराचा काच फोडला होता. शेजाऱ्यांनी पोलिसांत तक्रार केल्याने पाेलिसांनी त्याला असे न करण्याची समज देत सोडून दिले होते.

रघुवीरने वडिलांचा खून करण्याआधी त्याच्या आईला एका खोलीत बंद केले होते. आईने कशीतरी या घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली. यानंतर शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

सांगितले जाते की, तो मोबाइल रिचार्ज करण्यासाठी वडिलांकडून पैसे मागत होता. यातूनच वाद वाढत गेला आिण मुलाने वडिलांचा खून केल्याचे सांगण्यात येत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24