लोणी – राहाता तालुक्यातील निर्मळपिंपरी येथे पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेले राजेंद्र चंद्रभान बाराहाते, वय – ४७, रा. कोकमठाम, ता. कोपरगाव यांना ते निर्मळ यांच्या घरी असताना आरोपींनी लाकडी दांडा व लोखंडी पाईपने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देत डावा पाय फ्रेंक्चर करून दुखापत केली.
काल या प्रकरणी जखमी राजेंद्र चंद्रभान बाराहातो यांनी लोणी पोलीसात फिर्याद दिल्यावरून आरोपी रावसाहेब नामदेव निर्मळ हरिभाऊ नामदेव निर्मळ, भाऊसाहेब नामदेव निर्मळ, सचिन भाऊसाहेब निर्मळ, रामेश्वर भाऊसाहेब निर्मळ,
सुनंदा भाऊसाहेब निर्मळ, शोभा राजेंद्र बाराहाते, सर्व रा. निर्मळपिंपरी , ता. राहाता यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी सपोनि प्रकाश पाटील यांनी भेट दिली, हे कॉ देवचक्के हे पुढील तपास करीत आहेत. बाराहाते यांना मारहाण करण्यामध्ये सासरच्या लोकांसह पत्नीही सहभागी होती.