संतापजनक: एक लाखासाठी आईने केली मुलीची विक्री

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

दिल्ली : दिल्लीच्या बवानामधून एका १५ वर्षीय मुलीची सुटका करण्यात आली आहे. मुलीच्या आईने मागील आठवड्यात मुलीला विकले होते. दिल्ली महिला आयोगाने रविवारी ही माहिती दिली.

आयोगानुसार, सुटका करण्यात आलेल्या मुलीने सांगितले की, तिच्या आईने एक वर्षाच्या भावालाही गेल्या महिन्यात तस्करांकडे सोपवून त्या मोबदल्यात पैसे घेतले. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईने १५ सप्टेंबरला तिला तिच्या बहिणीच्या घरी बदरपूरला जात असल्याचे सांगितले.मात्र, त्या ऐवजी तिने तिला निजामुद्दीनमधील एका हॉटेलमध्ये आणले.

हॉटेलमध्ये सौदा केल्यानंतर आईने म्हटले की, तुला यांच्यासोबत जावे लागेल. शाहिद नावाच्या व्यक्तीने घरी नेले. शाहिद तिला घेऊन त्याचे गाव बवाना येथे आला. तिथल्या ईश्वर कॉलनीतील घरी मुलीला घेऊन गेला.

शाहिदच्या घरात असलेल्या अन्य मुलींनी तिला लग्नाचा जोडा घालून तयार होण्यास सांगितले. मुलीला सांगण्यात आले की, तिला तिच्या आईने एक लाख रुपयात विक्री केली आहे. घरात आल्यानंतर पहिल्याच दिवशी तिने पळ काढला. घरी आल्यावर तिने शेजाऱ्यांकडे मदत मागितली.

अहमदनगर लाईव्ह 24