अहमदनगर लाईव्ह24 टीम :- परदेशातून अहमदनगर जिल्ह्यात आलेला व्यक्ती विकत होता जीवनावश्यक वस्तू विक्री करताना आढळून आल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
[better-ads type=”banner” banner=”27880″ campaign=”none” count=”2″ columns=”1″ orderby=”rand” order=”ASC” align=”center” show-caption=”1″][/better-ads]
कोरोना संदर्भात खबरदारी म्हणून परदेशातून आलेल्या कोपरगाव शहरातील एका व्यक्तीस प्रशासनाने होम कोरंटाईनचा सल्ला देत घरात थांबण्यास सांगितले होते.
परंतु त्याने उल्लंघन केल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.त्याला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
बुधवारी (दि.२५ मार्च) कोपरगाव पोलिसांना गस्ती दरम्यान सदर व्यक्ती जीवनावश्यक वस्तूंची विक्री करताना आढळून आला.
सदर व्यक्तीने जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी तत्काळ त्यास ताब्यात घेतले.
त्याच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
[better-ads type=”banner” banner=”28914″ campaign=”none” count=”2″ columns=”1″ orderby=”rand” order=”ASC” align=”center” show-caption=”1″][/better-ads]
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com