माहेरून पैसे आणण्यासाठी छळ करणाऱ्या पतीसह तिघे अटकेत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अकोले | माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्या लोकांनी मारहाण व मानसिक छळ केल्याची फिर्याद दिशा तुषार शिंदे (वय २५, केतन अनंत पाटील सोसायटी, अग्रोळी बेलापूर, नवी मुंबई, हल्ली पिसेवाडी) यांनी दिली.

त्यानुसार तुषार चिमाजी शिदे, लक्ष्मी चिमाजी शिंदे, सचिन चिमाजी शिंदे (केतन अनंत पाटील सोसायटी, नवी मुंबई) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

फ्लॅट घेण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये, सोन्याची चेन व अंगठी आणण्यासाठी त्रास दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24