नगर :- जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात मिरजगाव येथे आरोपी अक्षय अविनाश शिंदे याने पालकमंत्री श्री. राम शिंदे यांच्या नावाचा गैरवापर करुन श्रीकांत आनंदा मांढरे, धंदा शेती, रा. बेलगाव, ता. कर्जत यांची व त्यांचे मावस माऊ जयवंत रामचंद्र गायकवाड यांना शासकीय नोकरीला लावतो, असे म्हणून दोघांकडून प्रत्येकी २ – २ लाख रुपये रोख रक्कम असे एकूण ४ लाख रुपये येवून त्यांची फसवणूक करुन विश्वासघात केला.
दोन महिन्यापूर्वी मिरजगाव येथे स्टॅण्ड परिसरात तनपुरे पेट्रोल पंपासमोर एका हॉटेलच्या बाहेर आरोपी अक्षय अविनाश शिंदे, अविनाश शिदे दोघे रा. चौंडी, ता. जामखेड हे उभे असताना तेथे फिर्यादी व त्यांचा मित्र, आशिष शिंदे, रा. बेलगाव तेथे गेले व आरोपी अक्षय अविनाश शिंदे, व अविनाश शिंदे यांना विचारले की आमच्याकडून तुम्ही शासकीय नोकरीला लावतो,
असे म्हणून ४ लाख रुपये घेतले आहेत आमच्या नोकरीचे काय झाले अशी विचारणा केली असता आरोपी १ अक्षय शिंदे याने फिर्यादी श्रीकांत मांढरे यांना जातीवाचक शिवीगाळ करुन पुन्हा जर पैसे मागितले तर तुमचा मुडदा पाडून टाकू, पालकमंत्री राम शिंदे हे आमच्या घरचे असून कोणाला काही कळणार नाही असे म्हणून फिर्यादीला जिवे ठार मारण्याची धमकी दिली व आरोपी २ याने जातीवाचक शिवीगाळ करत धमकावले.
वरीलप्रमाणे श्रीकांत आनंद मांढरे या शेतक- याने कर्जत पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी अक्षर अविनाश शिंदे, अविनाश शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून कर्जतचे डिवायएसपी संजय सातव, पोनि. राजेंद्र चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. डिवाएसपी सातव हे पुढील तपास करीत आहेत.