शिवीगाळ, दमदाटी करत चाकु दाखवत मारुन टाकण्याची धमकी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर : गंगा उद्यान परिसरातील मिस्किन मळा येथे पायी चालणाऱ्या निखिल राजेंद्र सोनवणे (वय १७, रा. चव्हाणवाडी, गेवराई, बीड)

यास चार अनोळखी इसमांनी काही एक कारण नसताना शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्यांनी मारून चाकुने मारुन टाकण्याची धमकी दिली.

या मारहाणीत निखिल सोनवणे गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि.११) रात्री ११ च्या सुमारास येथे घडली.

याप्रकरणी तोफखाना पोलीसांनी निखिल सोनवणे यांच्या फियार्दीवरून मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली असुन पुढील तपास पो.ना. वाकचौरे हे करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24