नगर :- शहरातील एका पतसंस्थेच्या रेशन दुकानात एक ४५ वर्षाची महिला काम करत असताना तेथे येवून आरोपी राहुल रतन त्रिभुवन, रा. दिल्ली गेट, सातभाई गल्ली, नगर याने दुकानच्या काऊंटरवर रेशन कार्ड आपटून जोरजोराने आरडाओरड करत माझ्या रेशनकार्डवर शिक्का दाखवा. तुम्ही माझे जाणून बुजून रॉकेल बंद केले, असे म्हणून शिवीगाळ करु लागला.
दुकान चालक महिलेशी हुज्जत घालून त्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे शब्द उच्चारुन व महिलेचा हात धरुन पिरगळला तेव्हा महिलेचा मुलगा सोडविण्यास आला असता त्यालाही शिवीगाळ करत लोखंडी गजाने मारुन जखमी केले व तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
याप्रकरणी पिडीत महिलेने वरीलप्रमाणे तोफखाना पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी राहुल रतन त्रिभुवन याच्याविरुद्ध भादवि कलम ३२४, ५०९, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सफौ भोसले हे पुढील तपास करीत आहेत.