अहमदनगर :- देवदर्शन करण्यासाठी सासूसह गेलेल्या महिलेस विनाकारण शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार सावेडी परिसरातील पाइपलाइन रस्त्यावरील तुळजाभवानी मंदिराजवळ रविवारी सायंकाळी घडला.
याप्रकरणी सुप्रिया काळे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी राम मोकाटे याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सुप्रिया काळे या सासूसमवेत दर्शनासाठी मंदिरात आल्या होत्या. आरोपी राम याने त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.