अहमदनगर :- रात्रीच्या वेळी वांबोरी घाटात अडूवन मारहाण करत लूटमार करणारे प्रमुख आरोपी अद्याप फरारच आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी या आरोपींकडून चोरीचा मोबाईल खरेदी करणाऱ्याला मात्र अटक केली आहे.
पाच दिवसांपूर्वी नगरहून वांबोरीला चाललेल्या एका व्यावसायिकाला या आरोपींनी बेदम मारहाण केली होती.
लूटमार करणाऱ्या प्रमुख आरोपींची नावे पोलिसांना समजली असली तरी आरोपी अद्याप फरारच आहेत.
मोठी व्यापारी पेठ असलेल्या वांबोरी गावाला जिल्ह्याच्या ठिकाणी जोडणारा जिल्हामार्ग वांबोरी घाट वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे. या घाटात रात्रीच्या वेळी वारंवार लुटीच्या घटना घडत आहेत.
वांबोरी येथील व्यावसायिक पंकज अशोक नाबरिया (३५, वांबोरी) यांना चोरट्यांनी वांबोरी घाटात अडवून मारहाण करून त्यांचा २५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. ही घटना १२ जुलैला रात्री घडली होती.