लाखो रुपयांच्या फसवणूक प्रकरणी महालक्ष्मी’ अध्यक्षासह १६ जणांवर गुन्हा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- ठेवीदारांच्या लाखो रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अखेर नगरच्या श्री महालक्ष्मी मल्टिस्टेट को-आपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन, व्हाइस चेअरमन यांच्यासह १६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी फसवणूक झालेला नगरमधील ठेवीदार सुनील व्यंकटेश देशपांडे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार सोसायटीच्या चेअरमन हेमा सुरेश सुपेकर, व्हाइस चेअरमन अशोक गंगाधर गायकवाड,

संचालक राहुल अरुण दामले, राजेंद्र सुखलाल पारख, अजय चंद्रकांत आकडे, मधुकर मारुतराव मुळे, मनीषा दत्तात्रेय कुटे, प्राजक्ता प्रकाश बोरुडे, डॉ. धैर्यशील जाधव, नागनाथ भिकाजी शेटे, संजय चंद्रकांत खोंडे,

चंद्रकांत सूरजमल आणेचा, प्रकाश बाबूलाल बच्छावत, मच्छिंद्र भिकाजी खाडे, श्यामराव हरी कुलकर्णी, सुनील रंगनाथ वाघमारे यांच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24