हुंडेकरी कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :-  उद्योजक करीमशेठ हुंडेकरी यांच्या अपहरण प्रकरणाला चार दिवस उलटले तरी पोलिस अद्याप मुख्य सूत्रधार अजहर मंजूर शेख याच्यापर्यंत पोहचू शकलेले नाहीत.

पोलिसांना गुंगारा देणारा अजहर हुंडेकरी कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे .
सोमवारी ( दि . १८ ) पहाटे नमाजसाठी जात असताना येथील प्रख्यात उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते करीमशेठ हुंडेकरी यांचे अजहर शेखने साथीदारांसह मंगलगेट भागात अपहरण केले.
पंचवीस लाख रुपयांची खंडणी पुढील महिन्यात देण्याच्या अटीवर त्यांना जालना बसस्थानक परिसरात सोडून दिले होते . त्यानंतर हुंडेकरी एसटी बसमधून नगरला परतले होते.
दरम्यान , हुंडेकरींच्या अपहरणाचे वृत्त शहरासह जिल्ह्यात वाऱ्याच्या वेगाने पसरले . पोलिसांनीही तातडीने पावले उचलली. त्यामुळे सावध होत मुख्य सूत्रधार अजहरने त्यांना जालन्याजवळ सोडून दिले.
परंतु तत्पूर्वी पुढील महिन्यात पंचवीस लाख रुपये द्यावे लागतील , तसेच या व्यवहाराची माहिती पोलिसांना होता कामा नये असा दम भरला होता.
पोलिसांनी अजहरच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतल्यावर या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला . परंतु मुख्य सूत्रधार अजहर मात्र चार दिवसांनंतरही पोलिसांना सापडू शकलेला नाही.
खंडणीसाठी अपहरण झाल्याने आधीच चिंतेत असलेल्या हंडेकरी कुटंबीयांना अजहर आता जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे.
घरच्या लॅण्डलाईन दरध्वनीवर वेगवेगळ्या क्रमांकांवरून तो संपर्क साधत असून , ‘ पंचवीस लाखांची खंडणी कोणत्याही परिस्थितीत द्यावीच लागेल ‘ असे सांगत ‘
आपल्यात झालेल्या व्यवहाराची माहिती पोलिसांना का दिली ? ‘ असे म्हणत तो करीमशेठ यांच्यासह कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत आहे.
गेल्या चार दिवसांत अजहरचे धमकी देणारे सात – आठ फोन आले आहे . या धमक्यांमुळे हुंडेकरी कुटुंबीय भयभीत असून , प्रचंड दडपणाखाली वावरत आहे .
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24