पालकमंत्र्यांच्या गावात अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला.

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

जामखेड :- पालकमंत्री राम शिंदे यांच्या जामखेड तालुक्यातील चौंडी गावात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

आरती पांडुरंग सायगुडे(वय-१७) असे मृत मुलीचे नाव असून. मृतदेह जळालेल्या अवस्थेत आहे. जलसंधारण मंत्री व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांचे हे गाव आहे.

आरती चापडगाव येथील महाविद्यालयात शिकत होती. तेथूनच ती आठ दिवसांपासून बेपत्ता होती. त्यानंतर गुरूवारी सकाळी तिचा मृतदेह तलाव परिसरात आढळून आला आहे.

मृतदेह जळालेल्या अवस्थेत असून तो कुजलेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना चार दिवसांपुर्वी घडली असून आज ती उघडकीस आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मुलीचा मृत्यू ही आत्महत्या की घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

अहमदनगर लाईव्ह 24