कर्जत :- तालुक्यात राक्षसवाडी खुर्द येथील विधवा वृध्द महिलेवर भर दिवसा अत्याचार करण्याची संतापजनक घटना घडली असून या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी दिवसभर सर्व दुकाने बंद ठेवली. तसेच गावामध्ये एकही घरामध्ये चूल पेटली नाही.
या घटनेतील आरोपीस तातडीने अटक करून त्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी संतत्प ग्रामस्थानी कर्जतचे पोलीस अधिकार्यांची भेट घेऊन केली आहे. हे गाव कोपर्डी गावाच्या शेजारी आहे.
या बाबत घडलेली घटना अशी कि, राक्षसवाडी खुर्द येथे काल गेल्या 5 जुलै रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गावातील गरीब वृध्द महिला तिला मिळालेल्या घरकूल योजनेतील घरामध्ये होती. तिच्या पतीचे 15 वर्षा पूर्वी निधन झाले आहे.
तिची सून ही बाळंतपणासाठी माहेरी गेली होती आणि मुलगा गाडीवर ड्रायव्हर असल्याने परगावी गेला होता. आसपासचे राहणारे लोकही शेतामध्ये पेरणीचे काम सुरू असल्याने तिकडे गेले होते.
दुपारी ही महिला घरामध्ये सारवण करीत होती. यावेळी तिथे गोरख भागुजी शिंगटे वय 45 हा घरामध्ये घुसला व त्याने त्या वृद्धेवर अत्याचार केला आणि जिवे मारण्याची धमकी देत पळून गेला.
यानंतर तिने ही सर्व हकीगत तिच्या भावाला संगितली असता तिला तातडीने रुग्णालयामध्ये नेण्यात आले. यानंतर नातेवाईकांनी कर्जत पोलिसांत गोरख भागुजी शिंगटे याच्याविरोधात फिर्याद दिली
असून या फिर्यादी वरून पोलिसांनी शिंगटे याच्या विरोधात भादवि कलम 376 व 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अत्याचार करून नराधम पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.