नेवासा :- तालुक्यातील कुकाणा परिसरात राहणारी एक ३१ वर्षाची महिला तिच्या घरात एकटीच असताना आरोपी संतोष मारुती गोडे, रा. कुकाणा हा महिलेच्या घरात घुसला व तू माझ्याविरुद्ध खोट्या तक्रारी करते काय? तुझ्याकडे पहातो, असे म्हणून शिवीगाळ करुन धरुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केला.
काल ११ वाजता हा प्रकार घडला, महिलेने नेवासा पोलिसात वरीलप्रमोण फिर्याद दिल्यावरुन आरोपी संतोष मारुती गोडे याच्याविरुद्ध भादवि कलम ३५४, ४५२, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोना फलके हे पुढील तपास करीत आहेत.