धक्कादायक : पोलिस कर्मचाऱ्याने युवतीकडे केली शरीरसुखाची मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- पोलिस कर्मचाऱ्यानेच युवतीला घरात कोंडून मारहाण करत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी पीडित युवतीच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी पोलिस कर्मचारी योगेश धाईंजे व त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यानेच हा प्रकार केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. धाईंजे हा एका महिन्यापासून पीडित युवतीचा पाठपुरावा करत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत होता.

अश्लील शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन तो युवतीशी वारंवार करत होता. माझ्या आईला तुझ्याशी बोलायचे आहे,

असा बहाणा करून तो युवतीला त्याच्या पोलिस मुख्यालयातील घरी घेऊन गेला.

घरी गेल्यानंतर युवतीला कोंडून घेत लाकडी दांडक्याने मारहाण केली. तिचा मोबाइलदेखील फोडून जिवे मारण्याची धमकी दिली.

त्याच्या आईने धाईंजे याला समजावून सांगण्याऐवजी युवतीलाच शिवीगाळ करत घरात कोंडून ठेवले.

याप्रकरणी युवतीच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी धाईंजे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24