प्रयागराज : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज जिल्ह्यात एका महिलेने पोटच्या तीन मुलांची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली. हंडिया तालुक्यातील असवा दाऊतपूर गावातील महिलेने रात्रीच्या सुमारास दोन मुलींची व एका मुलाची हत्या केली. यानंतर स्वत: आत्महत्या केली. पीडितांचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात दाखल केले आहेत. या आत्महत्येचे कारण मात्र अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नसल्याचे यावेळी प्रयागराजचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सत्यार्थ अनिरुद्घ पंकज यांनी सांगितले.