राहुरी :- तालुक्यातील वांबोरी येथील एकाने आपल्या पत्नी व मुलाचा खून केल्याची घटना रविवारी घडली होती.
त्यानंतर काल पत्नीच्या नातेवाईकाने आरोपी पतीच्या घरासमोरच या दोघांचा अंत्यविधी केला.
वांबोरीतील मोरेवाडी येथे कौटुंबिक वादातून काल भारत मोरे याने आपल्या चार वर्षांच्या मुलासह पत्नीची हत्या केली होती.
त्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी त्याला वेळीच पकडले होते. त्यानंतर त्यास अटक करण्यात येऊन व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते.
या घटनेने परिसरात स्मशान शांतता निर्माण झाली होती. शवविच्छेदन झाल्यानंतर मयताच्या संतप्त नातेवाईकांनी भारत मोरे याच्या घरासमोरच दोघांचा अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला.
रात्री साडेबाराच्या सुमारास घरासमोरच शोकाकूल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला.