पोलीस-दरोडेखोरांमध्ये धुमश्चक्री

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राहुरी : राहुरी पोलीस व दरोडेखोरांच्या टोळीमध्ये झालेल्या धुमश्चक्रीनंतर राहुरी पोलिसांनी चार अट्टल दरोडेखोरांना जेरबंद करण्यात यश मिळविले. तर दोघेजण पसार झाले. 

यावेळी पोलीस व दरोडेखोरांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत या दरोडेखोरांनी राहुरी पोलिसांवर विटांच्या तुकड्यांचा मारा करून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

सागर गोरख मांजरे (वय २२, पाईपलाईन रस्ता यशोदानगरजवळ, नगर), अविनाश अजित नागपुरे (वय २०, रा. भिंगार, ता. नगर), काशिनाथ मारुती पवार (वय ३७, रा. बजरंगवाडी, ता. संगमनेर), गणेश मारुती गायकवाड (वय २४, रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) अशी पकडलेल्या आरोपींची नावेत आहेत.

तर पसार झालेल्या दोन आरोपींची नावे मात्र अजून समजलेली नाहीत. आरोपींकडून गॅस कटर, एक कमर्शियल एलपीजी सिलेंडर, ऑक्सिजन सिलेंडर, तलवार, टॉमी, लोखंडी कटावणी, कात्री, गज, एक पोखर, लोखंडी सुरा, पेटी, चार मोबाइल, दोन दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24