राहुरी :- तालुक्यातील चिंचोली येथे राहणाऱ्या शेतकरी बाबासाहेब भोसले यांचा मुलगा किशोर बाबासाहेब भोसले तसेच किशोर भोसले याची आई व बहिण या चौघांना शेतातील रस्त्याने येण्या-जाण्याच्या कारणावरुन तलवार, लोखंडी गज लोखंडी दांडा, लोखंडी पाईपने घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आली.
जखमी किशोर बाबासाहेब भोसले या विध्यार्थ्याने काल राहुरी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन मारहाण करणारे आरोपी अशोक लक्ष्मण भोसले, विठ्ठल लक्ष्मण भोसले, दत्तात्रय लक्ष्मण भोसले, रा. चिंचोली खडक, डोहवस्ती, ता. राहुरी, निलेश अमोलिक, रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर, संतोष पाळदे, रा. दाढ बु. ता. राहाता, गोरे पूर्ण नाव माहीत नाही याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.