संगमनेर :- तालुक्यातील एका तीस वर्षीय युवतीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
मनोज वसंत कांगणे (रा. हंगेवाडी, ता. संगमनेर) असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. अत्याचाराच्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
संगमनेर तालुक्यातील आरोपी मनोज वसंत कांगणे याने २५ मार्च २०१८ ते १ मे २०१९ या कालावधीत फिर्यादी युवतीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला.
याबाबत कोणाला काही सांगितले, तर तुझी बदनामी करून तुला जीवे मारून टाकीन, अशी धमकीही त्याने दिली.
याप्रकरणी आई वडिलांसमवेत पोलीस ठाणे गाठत पीडित युवतीने फिर्याद दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.