कर्जत :माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना कर्जत तालुक्यात घडली . एका विवाहितेवर अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली .
या प्रकरणी महेश राजेंद्र धांडे (रा. धांडेवस्ती, कर्जत) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने कर्जत पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, अत्याचारानंतर जातीवाचक शिवीगाळ करून, हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्यात म्हटले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव पुढील तपास करीत आहेत.