मदत वाटपाचे फोटो पोस्ट करणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- लॉकडाऊनच्या काळामध्ये अन्नधान्य, फुड पाकीट, जेवण व अन्य मदत देत असल्याबाबतचे फोटो व व्हिडिओ काढून सोशल मिडीयामध्ये अनेकजण पोस्ट करीत आहेत.

अशा प्रकारच्या पोस्ट करणाऱ्यांवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी निर्बंध घातले असून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची मुदत आता ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या काळात अनेक गरजू नागरिकांना मदत म्हणून अन्नधान्य, जेवण, कीट, फुड पाकीट व अन्य साहित्याचे वितरण करण्यात आले. या मदतीचे अनेकांनी फोटो व व्हिडीओ काढून सोशल मिडीयावर मोठ्याप्रमाणात पोस्ट केले गेले.

मदत करणाऱ्यांचा उद्देश जरी चांगला असला तरी यामुळे गरजू व्यक्तींचा स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. ही परिस्थिती आणि सामाजिक भान लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदीयांनी फोटो, व्हिडीओ काढून प्रसारित करण्यास निर्बंध घातले आहेत.

दानशुरांनी गरजूंना मदतीचा हात द्यावा. परंतु, फोटो व व्हिडीओ प्रसारित करु नये. तसेच केल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24