अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : पाथर्डी तालुक्यातील शिराळ येथे दोन गटांत रविवारी दुपारी तुंबळ हाणामारी झाली होती. याबेळी झालेल्या गोळीबारात गोळी एकाच्या पायात शिरल्याने तो गंभीर जखमी झाला.
तसेच इतर चौघेही मारहाणीत जखमी झाले होते. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. दोन्ही गटांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसांनी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पालवे यांच्यासह २0 ते २५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
चिचोंडी शिराळ येथे रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शेतीच्या वादातून दोन गटांत झालेल्या तुफान हाणामारीत एका गटाकडून गोळीबार करण्यात आल्याने एका तरुणाच्या पायाला गोळी लागली होती. या हाणामारीत एकमेकांवर तुफान दगडफेकही करण्यात आली.
हाणामारी दरम्यान चारचाकी गाड्यांची देखील तोडफोड करण्यात आली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याने दोन्ही बाजूंचे मिळून सुमारे 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews