अहमदनगर Live24 ,17 जून 2020 : प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करत सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करणाऱ्या ३५ जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
भाजपकडून नगरसेवक पदाची निवडणूक लढलेले विनय वाखुरे यांनी 13 जून रोजी शहरातील प्रोफेसर चौक परिसरात गर्दीत आपला वाढदिवस साजरा केल्याने
तोफखाना पोलीस ठाण्यात विनय वाखुरे यांच्यासह अजय रासकर, संदीप चौधरी, महेश थोरात, मयुर कुलकर्णी व निखिल मोयल व इतर 30 ते 35 जणांविरोधात सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस नाईक अजय गव्हाणे यांनी फिर्याद दाखल केली आहे.वाखुरे यांनी कुठलीही परवानगी न घेता प्रोफेसर चौकातील अबेदिन पेंट्स येथे एकत्र जमून वाढदिवस साजरा करत शासकीय आदेशाचा भंग केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews