अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- सध्या शेतकरी अनेक संकटाशी झुंज देत आहे. आधी कोरोनामुळे खचलेला शेतकरी अतिवृष्टीने पिचला. निकृष्ट बियाणे, यावेळी पाऊस यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले.

आता पुन्हा शेतकऱ्यांवर केसाळ अळींचे संकट ओढवले आहे. नेवासे तालुक्यातील अनेक गावांमध्ये सोयाबीन, सुर्यफूल, भुईमूग पिकांवर केसाळ अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

वनस्पती, पिकांची पाने खाणारी ही अळी आहे. या अळीच्या विविध प्रजाती आढळतात. प्रामुख्याने सोयाबीन व सुर्यफुलावर स्पिलोसोमा ऑब्लिकव्या तर भुईमुगावर अमुस्काटा अल्बिस, ट्रायगा या प्रजाती आढळतात.

या अळ्या पानातील हरितद्रव्य खातात व त्यामुळे पाने जाळीदार होतात. पिकांची योग्य वाढ होत नाही. सोयाबीन पिकावर साधारणपणे ज्या केसाळ अळ्या आढळतात,

त्यांचा रंग लहान असताना मळकट पिवळा तर त्या मोठ्या झाल्यावर भुरकट-लाल असा होतो. या नव्या संकटाने शेतककरी खचला आहे.

याच्या नियंत्रणासाठी जमिनीची खोल नांगरट करावी, दर्प सापळ्यांचा वापर करावा. शेतकडेला चर खोदावेत. अंतर पीक पद्धतीचा अवलंब करावा.

अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. जैविक उपाय- बी. टी. 1 किलो प्रति हेक्टर रासायनिक उपाय- फोसेलोन 35 ईसी 2 मिली किंवा ट्रायझोफॉस 1.6 मिली किंवा क्विनालफॉस 2 मिली किंवा लाबडासाय हॅलोथ्रीन 0.6 मिली प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24