अकार्यक्षम आमदारांमुळे तालुक्याचा विकास खुंटला या माजी आमदाराची टीका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :-शेवगाव पाथर्डी मतदारसंघात विकासकामाची गंगा मतदार संघातील नागरिकांना हवी असेल तर या पुढे शेवगाव तालुक्यातीलच प्रतिनिधी विधानसभेत आपल्याला निवडून द्यावा लागेल.

यावेळी शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील जनतेने अकार्यक्षम आमदाराला निवडून दिले. त्यामुळे तालुक्याचा विकास खुंटला.अशी टीका माजी आमदार नरेंद्र घुले यांनी आमदार राजळे यांचे नाव न घेता केली.

तालुक्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. नागरिकांनी मोठ्या अपेक्षेणे त्यांना निवडून दिले मात्र तालुक्यात विकासकामे झाली नाहीत.

म्हणून येथून पुढे आपल्याला आपल्या तालुक्याचा व परिसराचा विकास हवा असेल तर आपल्या हक्काचा व आपली कामे करणारा शेवगाव तालुक्यातील प्रतिनिधी विधानसभेत पाठवावा असे आवाहन माजी आ.नरेंद्र घुले यांनी केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24