अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील ५४ गावांमधील ७ हजार ४७८ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असून ११ हजार २६१ शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला.
९ कोटी ६४ लाख २८ हजार १९८ रुपयांची भरपाई अपेक्षित आहे. मागील काही महिन्यांपासून तालुक्यातील सर्व ५४ गावांमध्ये अतिवृष्टी झाली.
त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकांसह ऊस व फळबागांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर तात्काळ कृषी व महसूल विभागाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे केले.
नुकसानीची अंतिम आकडेवारी प्राप्त झाली. या अहवालानुसार ५४ गावांमधील ११ हजार २६१ शेतकऱ्यांचे ७ हजार ४७८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.
खरिपात २४ हजार ४३१ हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्यात आली होती. जिरायत पिकाखालील क्षेत्रात ७९९.९६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून ९ हजार ९८० शेतकऱ्यांना फटका बसला.
शासकीय नियमानुसार हेक्टरी ६ हजार ८०० रुपये प्रमाणे ६१ लाख ५२ हजार ७०८ रुपये मागणी करण्यात आली. बागायत क्षेत्रातील ६ हजार ६५२.१४ हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाले असून ९ हजार ९८० शेतकऱ्यांना फटका बसला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved