पुन्हा CRPF च्या बसला स्फोटकांची कार धडकली !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील श्रीनगर-जम्मू महामार्गावर पुलवामासारखा हल्ला होता होता राहिला. स्फोटकाने भरलेल्या एका कारने सीआरपीएफच्या बसला मागून धडक दिली.

मात्र सुदैवाने ही बस पुढे निघून गेली आणि त्या कारमध्येच हा स्फोट झाल्याने मोठी जीवितहानी टळली. या स्फोटात कारचा चक्काचूर झाला आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे सीआरपीएफच्या 6-7 बसचा ताफा निघाला होता. त्यामध्ये जवळपास 40 जवान होते. मात्र सुदैवाने कोणत्याही जवानाला दुखापत झाली नाही.

दरम्यान, आजचा स्फोट बनिहाल बोगद्याजवळ झाला. एक सँट्रो कार महामार्गावर उभी होती. सीआरपीएफचा ताफा जवळ येताच, या कारमध्ये स्फोट झाला. या कारमध्ये कोणीही नव्हतं. कारचालक फरार झाल्याने सुरक्षा संस्थांची शंका आणखी अधोरेखित झाली.

सुरुवातीला हा कारमधील सिलेंडर स्फोट असावा अशी सर्वांची धारणा झाली. कारचं छत हवेत उडालं. मात्र त्याचवेळी ड्रायव्हर गायब झाला. सीआरपीएफचा ताफा या कारपासून लांब होता.

मात्र हा स्फोट इतका भीषण होता की, लांबवर असूनही सीआरपीएफच्या एका बसला किरकोळ नुकसान झालं. सध्या सुरक्षा रक्षकांनी या परिसराची घेराबंदी केली असून कसून तपास सुरु आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24