अहमदनगर ब्रेकिंग : ट्रॅक्टरने चिरडले ! अपघातात दोन युवक ठार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar breaking : माजलगाव तालुक्यातील सादोळा गावानजीक असलेल्या सांगवी पुलाजवळ वाळूने भरलेल्या ट्रक्टरने मोटारसायकला जोराची धडक दिली. त्यात राहाता तालुक्यातील रांजणखोल येथील दोन युवक जागीच ठार झाले.

मंगळवारी (दि.३०) जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात मयत झालेल्या तरुणाचे विजय युवराज पगारे (वय ३५) व अमोल रावसाहेब ढोकचौळे (वय ३३, रा. रांजणखोल, ता. राहाता) असे नावे आहे.

ते मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ते मोटारसायकल क्रमांक एमएच १७ डब्लु ३२०९ (युनिकार्न) माजलगाव तालुक्यातील सादोळा गावानजीक सांगवी पुलाजवळ आष्टी येथे जात होते. त्यावेळी सादोळा येथे वाळु घेऊन जाणाऱ्या ट्रक्टरने मोटारसायकला जोराची धडक दिली.

या अपघातात दोन्ही मोटारसायकलस्वार जागीची ठार झाले. दरम्यान, सादोळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शवविच्छेदन करून अपघातातील दोन्ही वाहने ताब्यात घेण्यात आले आहे. ट्रॅक्टर जळगाव गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत चालू होते.

पुढील तपास माजलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल करीत आहेत. मयत अमोल ढोकचौळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. तर मयत विजय पगारे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ, असा परिवार आहे.