डेटा प्रकरण : अ‍ॅमेझॉनला होऊ शकतो 1.38 लाख कोटी रुपयांचा दंड ; वाचा…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :-दिग्गज ई-कॉमर्स कंपनी Amazon ला 19 अब्ज डॉलर्स (1.38 लाख कोटी रुपये) दंड होऊ शकतो. कारण Amazon वर विक्रेत्यांचा डेटा चुकीच्या पद्धतीने वापरल्याचा आरोप आहे. या प्रकरणात, युरोपियन युनियन नियामकांनी Amazon विरूद्ध अनुचित व्यवहार चा गुन्हा दाखल केला आहे.

लाभ घेण्यासाठी डेटा वापरा:-  नियामकांचा असा आरोप आहे की ई-कॉमर्स कंपनी आपला प्लॅटफॉर्म वापरुन व्यापाऱ्यांविरुद्ध अनुचित फायदा घेण्यासाठी डेटाचा वापर करीत आहे. ईयू कमिशनने सांगितले की हे आरोप कंपनीकडे पाठविण्यात आले आहेत. असे म्हटले जाते की Amazon ने आपल्या मार्केट प्लेसवर स्वतःच्या लेबल केलेल्या वस्तूंची विक्री वाढविण्यासाठी थर्ड पार्टी विक्रेत्यांचा डेटा वापरला आहे. आयोगानेही नवीन तपास सुरू केला आहे.

Amazon ने हे आरोप फेटाळून लावले :- अ‍ॅमेझॉनने हे आरोप फेटाळून लावले आहेत. तथापि, Amazon हे कॉम्पिटिशन नियम मोडण्यात दोषी आढळल्यास त्याच्या एकूण जागतिक उलाढालीच्या 10% दंड आकारला जाऊ शकतो. ही रक्कम सुमारे 19 अब्ज डॉलर्स असू शकते. एका निवेदनात, युरोपियन युनियन कॉम्पिटिशन आयुक्तांनी म्हटले आहे की जर Amazon त्या विक्रेत्यांचा स्पर्धक असेल तर ते थर्ड पार्टी विक्रेत्यांच्या क्रियांचा डेटा स्वतःच्या फायद्यासाठी वापरू शकत नाही.

अमेझॉन हे लीडिंग प्लेटफॉर्म आहे:-  आयोगाने म्हटले आहे की ई-कॉमर्समध्ये तेजी असताना, Amazon हे या क्षेत्रासाठी अग्रणी व्यासपीठ आहे. अशात , सर्व विक्रेत्यांसाठी ऑनलाइन ग्राहकांपर्यंत योग्य आणि निशापक्ष पोहोच महत्वपूर्ण आहे. युरोपियन कमिशन व्यापाऱ्यांच्या तक्रारीनंतर गेल्या वर्षी जुलैपासून अ‍ॅमेझॉनची चौकशी करत आहे. असे म्हटले आहे की दिग्गज कंपनीने आपला प्लॅटफॉर्म वापरणार्‍या छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांकडून संवेदनशील डेटा ऍक्सेस मिळवला आहे. या डेटामध्ये विक्री आकडेवारी, पेज विजिट्स किंवा शिपिंग माहिती समाविष्ट आहे. अ‍ॅमेझॉनने नंतर हा डेटा स्वतःची लेबल असलेली उत्पादने विकण्यासाठी वापरला.

प्राइवेट लेबल प्रोडक्ट ग्राहकांसाठी महत्वपूर्ण :- Amazon ने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांची प्राइवेट लेबल प्रोडक्ट्स ग्राहकांसाठी चांगली आहेत, जिथे ते अधिक लोकप्रिय असलेल्या उत्पादनांची ऑफर करतात. ग्लोबल रिटेल बाजारात Amazon चा 1% वाटा आहे. Amazon म्हणाले की प्रत्येक देशात ते मोठ्या रिटेलर्स विक्रेत्यांसह काम करीत आहेत आणि कोणतीही कंपनी छोट्या व्यवसायांची काळजी घेत नाही किंवा त्यांना जास्त पाठिंबा देत नाही. पण Amazon हे काम गेली 20 वर्षे करत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24